Corona Cases in Akola : सहा जणांचा मृत्यू : ४०८ पॉझिटिव्ह, तर ६१५ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 19:24 IST2021-05-23T19:24:08+5:302021-05-23T19:24:49+5:30
Corona Cases in Akola: गत अनेक दिवसानंतर रविवारी प्रथमच मृत्यूचा आकडाही घसरला असून, सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

Corona Cases in Akola : सहा जणांचा मृत्यू : ४०८ पॉझिटिव्ह, तर ६१५ जणांची कोरोनावर मात
अकोला : गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा आलेख सपाट होत असून, नव्याने बाधित होणार्यांपेक्षा कोरोनावर मात करणार्यांची संख्या वाढत आहे. रविवार, २३ मे रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६२, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १४६ असे एकूण ४०८ रुग्ण आढळून आले, तर तब्बल ६१५ जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, गत अनेक दिवसानंतर रविवारी प्रथमच मृत्यूचा आकडाही घसरला असून, सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,१३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,८७६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये गजरखेड आपातापा येथील ५० वर्षीय पुरुष, कृषि नगर येथील ६१ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६१ वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर येथील २७ वर्षीय पुरुष, गीता नगर भागातील ५५ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-३२, अकोट- ३७, बाळापूर-१३, तेल्हारा-२५, बार्शी टाकळी-२०, पातूर-१६, अकोला-११९. (अकोला ग्रामीण-३०, अकोला मनपा क्षेत्र-८९)
६१५ जण कोरोनामुक्त
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४० , आयुर्वेदिक महाविद्यालय येथील दोन, खासगी रुग्णालयांमधील ६३, होम आयसोलेशन मधील ५१० अशा एकूण ६१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३,७५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४६,३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १०१० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.