Corona Cases in Akola : १३ जणांचा मृत्यू, ६५९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 10:24 IST2021-05-15T10:24:39+5:302021-05-15T10:24:46+5:30

Corona Cases in Akola: आणखी १३ रुग्णांचा बळी घेतला, तर ६५९ जणांना आपल्या विळख्यात घेतले आहे

Corona Cases in Akola: 13 killed, 659 positive | Corona Cases in Akola : १३ जणांचा मृत्यू, ६५९ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : १३ जणांचा मृत्यू, ६५९ पॉझिटिव्ह

अकोला: कोरोनाने जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांचा बळी घेतला, तर ६५९ जणांना आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनाचा कहर सुरू असला, तरी गुरुवारी ५७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी मास्कचा वापर, इतरांपासून सुरक्षित अंतर, तसेच नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये बार्शीटाकळी येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णासह पाटी दहिहांडा येथील ८२ वर्षीय पुरुष, अकोट तालुक्यातील पिंपरी खु. ७२ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील ४० वर्षीय पुरुष, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ८० वर्षीय पुरुष, मजलापूर दापोरा येथील ८० वर्षीय महिला, रणपिसेनगर येथील ७४ वर्षीय महिला, अकोट फैल येथील ३५ वर्षीय पुरुष, तेल्हारा तालुक्यातील वाडी येथील ५५ वर्षीय महिला, तेल्हारा येथील ५२ वर्षीय पुरुष, अकोट तालुक्यातील बोर्डी येथील ८० वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ७१ वर्षीय पुरुष, जठारपेठ येथील ८५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मृतकांची संख्या आता ८६४ वर पोहोचली आहे. गुरुवारी ६५९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये ४४० आरटीपीसीआर चाचणीचे, तर २१९ अहवाल रॅपिड चाचणीचे आहेत.

मनपा क्षेत्रात सर्वाधिक पॉझिटिव्ह

तालुका - रुग्णसंख्या

मूर्तिजापूर - २९

अकोट - ७८

बाळापूर -३३

तेल्हारा -३६

बार्शिटाकळी -२५

पातूर -५७

अकोला -१८२ (ग्रामीण-४१, मनपा १४१)

Web Title: Corona Cases in Akola: 13 killed, 659 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.