कोरोना: चिंताग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत अकोला जिल्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:12+5:302021-03-20T04:17:12+5:30
चिंताग्रस्त यादीत अकोला शेवटच्या स्थानी मागील १५ दिवसांच्या कालावधीत कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश ...

कोरोना: चिंताग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत अकोला जिल्हा!
चिंताग्रस्त यादीत अकोला शेवटच्या स्थानी
मागील १५ दिवसांच्या कालावधीत कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश चिंताग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत झाला आहे. या कालावधीत अकोला जिल्ह्यात २० टक्के रुग्णवाढ झाल्याची माहिती आहे. या १३ जिल्ह्यांच्या यादीत अकोल्याचा क्रमांक शेवटच्या स्थानी आहे. असे असले, तरी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील चिंताग्रस्त जिल्हे - रुग्णसंख्या वाढ (टक्केवारीत)
नांदेड - ३८५
नंदुरबार - २२४
बीड - २१९
धुळे - १६९
नाशिक - १५७
जळगाव - १४७
भंडारा - १४०
नागपूर - १२२
चंद्रपूर - ९५
अहमदनगर - ७२
बुलडाणा - ६५
औरंगाबाद - ५८
अकोला - २०