Corna Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ८१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:59 IST2021-06-10T18:59:40+5:302021-06-10T18:59:47+5:30
Corna Cases in Akola : एकूण ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५६९५८ झाली आहे.

Corna Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ८१ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात गुरुवार, १०जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १००६ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यामध्ये ५१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३० असे एकूण ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५६९५८ झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७६९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७१८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापूर- १५, बार्शीटाकळी-एक, पातूर-दोन, बाळापूर-चार, तेल्हारा-दोन, अकोट-पाच, अकोला-२२. (अकोला ग्रामीण-पाच, अकोला मनपा क्षेत्र- १७)
२७८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १४, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील एक, खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमधील ३३, तर होम आयसोलेशन मधील २३० अशा एकूण २७८ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,९२९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,९५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५३,९२३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,९२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.