महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविली
By Admin | Updated: December 14, 2015 02:37 IST2015-12-14T02:37:51+5:302015-12-14T02:37:51+5:30
दुचाकीवरील चोरटट्यांचा प्रताप.

महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविली
अकोला : मलकापूर परिसरातील कोठारी वाटिका येथून एक महिला स्वाध्यायमाला ध्यान के ंद्रामध्ये जात असताना या महिलेच्या गळय़ातील तब्बल ५२ ग्रॅम सोन्याची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने हिसकून पळ काढल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दर तिसर्या दिवशी अशा प्रकारच्या घटना घडत असताना पोलीस मात्र दुचाकीवरील चोरट्यांना शोधण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत.कोठारी वाटिका येथील रहिवासी जयश्री पाटील ही महिला तिच्या घरून कोठारी वाटिकेतच असलेल्या स्वाध्यायमाला ध्यान केंद्रात जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे ५२ ग्रॅमची सोनसाखळी किंमत अंदाजे एक लाख रुपये हिसकली. पाटील यांनी आरडा-ओरड केली मात्र, तोपर्यंंत चोरटा सोनसाखळी घेऊन पसार झाला. पोलीस दप्तरी या सोन्याची किंमत ५५ हजार रुपये असली तरी त्यांच्या ५२ ग्रॅम सोन्याची किंमत आजच्या भावानुसार सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती महिलेने दिली. शहरात मंगळसूत्र व दागिने हिसकणार्या टोळीने प्रचंड हैदोस घातला असून, दर दिवसाआड ही घटना घडत आहे. मात्र पोलिसांनी अद्या पही अशा घटनांचा तपास गांभीर्याने केला नसल्याचे दिसून येत आहे. आता विवाह सोहळय़ांना प्रारंभ झाला असून, अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा चोरट्यांवर नजर ठेवण्याची गरज आहे. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी खदान पोलीस ठाण्या त दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दा खल केला आहे.