काँग्रेसने संकल्प दिनी जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:51+5:302021-06-20T04:14:51+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी काॅँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ...

Copies of Agriculture Act burnt by Congress on Sankalp Day | काँग्रेसने संकल्प दिनी जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती

काँग्रेसने संकल्प दिनी जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी काॅँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत राज्यभरात वाढदिवसानिमित्त संकल्प दिन साजरा करण्याचे निर्देश दिले हाेते. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर केंद्र शासनाच्या धाेरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी महापौर मदन भरगड, कपिल रावदेव, रमाकांत खेतान, अशोक अमानकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन डाफे, नगरसेविका विभा राऊत, सीमा ठाकरे, महेंद्र गवई, मो. युसूफ, नगरसेवक मो. इरफान, मोंटू भाई, अभिलाष तायडे, सुरेश ढाकोलकर, जितेंद्र बगाटे, राजू चितलांगे, आकोश सायखेडे, मो. आरिफ, खिजर खां ,विशाल इंगळे, राजकुमार शिरसाट, प्रशांत प्रधान, अजहर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Copies of Agriculture Act burnt by Congress on Sankalp Day