चाळिशीनंतर वाढतोय ‘सीओपीडी’ आजाराचा धोका
By Admin | Updated: September 7, 2014 01:30 IST2014-09-07T01:30:57+5:302014-09-07T01:30:57+5:30
औद्योगिक वसाहतीत राहणारे, धूम्रपान करणारे व चुलीवर काम करणार्या महिलांना आजाराचा त्रास

चाळिशीनंतर वाढतोय ‘सीओपीडी’ आजाराचा धोका
सचिन राऊत / अकोला
औद्योगिक वसाहतीतील रहिवासी, धूम्रपानाची सवय, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वापरण्यात येत असलेल्या रॉकेलमि२िँं१्रूँं१त पेट्रोल-डिझेलमधील प्रदूषण, रासायनिक धुळीचे कण व चुलीचा धूर या विविध कारणांमुळे चाळिशीनंतरच्या नागरिकांना क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीझ (सीओपीडी) या आजाराने विळखा घातला आहे. या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. देशातील तब्बल दोन कोटी ५0 लाख नागरिक या आजाराने ग्रस्त आहेत. नागरिकांनी ४0 वर्ष वय ओलांडल्यानंतर त्यांना या आजाराचा हळूहळू त्रास होऊ लागतो; मात्र रुग्णाला याचा परिणाम जाणवत नाही. या आजारामुळे दम लागतो; मात्र रुग्ण स्वत:ला ठणठणीत असल्याचे समजतो. अशा रुग्णाची तपासणी केल्यास त्यांना तब्बल ४0 टक्क्यांपर्यंत दम असल्याचे समोर येत असून, त्यांच्या शरीरामध्ये या आजाराने कासवगतीने प्रवेश केल्याचे दिसून येते. हा आजार शरीरामध्ये हळूहळू होत असून, त्यावर कायमस्वरूपी कुठलाही उपाय नसल्याचेही समोर आले आहे. औषधोपचाराने रुग्णाला काही प्रमाणात आराम मिळत असला तरी यावर अद्याप कायमस्वरूपी उपाय नसल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. धूम्रपान करणार्या रुग्णांनी धूम्रपान टाळल्यास त्यांना या आजाराचा त्रास बर्याच प्रमाणात कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कमी वया तच धूम्रपानाची सवय असलेल्यांना ४0 वर्षांपेक्षा कमी वयातच या आजाराने ग्रस्त केल्याचे वृत्त आहे. या आजाराचे नेमके कारण धूम्रपान असून, १00 टक्क्यांपैकी ६0 टक्के पुरुषांना सीओपीडी आजाराने ग्रासले असून, ४0 टक्केप्रमाण महिलांचे आहे. या आजारामुळे फुप्फुसामधील हवा आत व बाहेर नेणार्या वातनलिका अरुंद होतात व त्यामुळे फुप्फुसात जाणार्या हवेचे प्रमाण अत्यंत कमी होते. वातनलिकेतील बदलामुळे रुग्णाच्या त्रासात वाढ होत असून, छातीत गच्च झाल्यासारखा त्रास वाढतो. यामुळे रुग्णाला धाप लागण्यास प्रारंभ होत असून, दम कोंडणे व जीव घाबरण्यासारखे त्रासही या आजारामुळे होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
** जीवघेण्या आजारांमध्ये नंबर वन
सीओपीडी या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे २0२0 पर्यंत सीओपीडी हा आजार जीवघेण्या आजारामध्ये क्रमांक एकचा आजार होणार असल्याचे संकेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)ने दिले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी डब्ल्यूएचओकडून प्रयत्न करण्यात येत असून, त्यांनी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यासाठी प्रदूषण रोखणे व धूम्रपान कमी करणे हा उपायही डब्ल्यूएचओने सांगितला आहे.
** मेट्रो शहरातील महिलांना अधिक त्रास
मोठय़ा आणि मेट्रो शहरांमध्ये राहणार्या महिलांना धूम्रपान करण्याची सवय आहे. त्यामुळे अशा शहरातील महिलांना या आजाराचा अधिक त्रास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेट्रो शहरातील महिलांचे जेवढे प्रमाण या आजाराचे आहे तेवढेच प्रमाण चुलीवर स्वयंपाक करणार्या महिलांचे असून, त्यांना या आजाराचा त्रासही भयंकर असल्याची माहिती आहे.