अखेर वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST2021-09-05T04:23:24+5:302021-09-05T04:23:24+5:30
अन्न व औषध प्रशासन घेणार अंतिम निर्णय दोन दिवसांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी यांनी वादग्रस्त ठरलेल्या बी.पी. ठाकरे रक्तपेढीला सीलबंद ...

अखेर वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील!
अन्न व औषध प्रशासन घेणार अंतिम निर्णय
दोन दिवसांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी यांनी वादग्रस्त ठरलेल्या बी.पी. ठाकरे रक्तपेढीला सीलबंद करण्याचे आदेश दिले. तसेच हे प्रकरण पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित केले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनामार्फत या प्रकरणाची आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच रक्तपेढीवर अंतिम कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही रक्तपेढी सीलबंद राहणार आहे.
चिमुकलीला संक्रमित रक्ताचा पुरवठा प्रकरणी बी.पी. ठाकरे रक्तपेढीचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चौकशीदरम्यान रक्तपेढीच्या कार्यपद्धतीत काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत.
- डॉ. वंदना वसो (पटोकार) जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
बी.पी. ठाकरे रक्तपेढीच्या चौकशी अहवालामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्तपेढी तत्काळ सीलबंद करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला