उद्योगांची माहिती ‘ऑनलाईन’ नोंदणीचे काम सुरू
By Admin | Updated: June 15, 2014 22:22 IST2014-06-15T21:39:54+5:302014-06-15T22:22:34+5:30
अकोला जिल्हय़ात सहावी आर्थिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण

उद्योगांची माहिती ‘ऑनलाईन’ नोंदणीचे काम सुरू
अकोला : सहाव्या आर्थिक गणना अंतर्गत जिल्हय़ात गटनिहाय उद्योग, व्यापार व व्यवसायांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रगणकांमार्फत संकलित करण्यात आलेल्या उद्योग-व्यवसायांची माहिती ह्यऑनलाईनह्ण नोंदणी करून शासनाकडे पाठविण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सध्या सुरू आहे.
शासनामार्फत सहावी आर्थिक गणना अंतर्गत कुटुंबनिहाय उद्योग, व्यवसाय आणि व्यापारासंबंधी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील तालुकानिहाय गटांतर्गत प्रगणकांमार्फत उद्योग, व्यवसाय आणि व्यापारासंबंधी माहिती संकलित करण्याचे काम मे अखेर पूर्ण करण्यात आले.
सर्वेक्षणात प्रगणकांमार्फत जिल्हय़ातील सातही तालुक्यात अकोला मनपा क्षेत्रासह नागरी भागात १ हजार १५९ गट अंतर्गत क्षेत्रात आणि ग्रामीण भागात सातही तालुक्यातील २ हजार ४८२ गटातील क्षेत्रात उद्योग-व्यवसायासंबंधी माहिती संकलित करण्यात आली. संकलित करण्यात आलेल्या माहितीची ह्यऑनलाईनह्ण नोंदणी करून, शासनाकडे पाठविण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सध्या सुरू आहे.
येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय ऑनलाईन माहिती पाठविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत संपूर्ण देशातील उद्योग, व्यवसाय व व्यापारासंबंधीची माहिती एकाच दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.