‘डॅडीं’ना वैचारिक अभिवादन
By Admin | Updated: July 22, 2014 00:43 IST2014-07-22T00:43:16+5:302014-07-22T00:43:16+5:30
अमोल चौधरीला सुवर्ण पदक बहाल

‘डॅडीं’ना वैचारिक अभिवादन
अकोला : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॅडी देशमुख यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सोमवारी अर्थशास्त्रावरील वैचारिक चिंतन ऐकण्याची संधी अकोलेकरांना मिळाली. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एम.ए. अर्थशास्त्रात सर्वाधिक गुण मिळविणार्या अमोल चौधरीला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात सोमवारी डॅडी देशमुख यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अमरावती येथील अर्थशास्त्रज्ञ प्रा. डी.व्ही. जहागीरदार उपस्थित होते. मंचावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, कवी नारायण कुळकर्णी कवठेकर, ललित कला अकादमीच्या उपाध्यक्ष डॉ. शोभा भागडे, बाबूजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र, वशिष्ठ नारायण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून नारायण कुळकर्णी यांनी डॅडींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखविले. महादेवराव भुईभार यांनी पुण्यतिथी हा संकल्पाचा दिवस आहे. डॅडीच्या पुण्यतिथीला डॅडींच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. शिवाजी महाविद्यालयाच्या जडण-घडणीत डॅडींच्या महत्त्वपूर्ण वाट्याचा त्यांनी गौरव केला. सुभाष भडांगे यांनी डॅडींच्या कार्यामुळे महाविद्यालयात काम करणे सोपे झाले असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते प्रा. जहागीरदार यांनी ह्यराजकारण आणि अर्थकारण- परस्पर प्रभावह्ण या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प केंद्रबिंदू ठेवून राजकारण आणि अर्थकारण हे एकमेकांशी कसे निगडित आहेत हे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्त्रातील गुणवत्ता यादीत प्रथम असणार्या अमोल चौधरी याचा सत्कार करण्यात आला. त्याला सुवर्ण पदक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. संचालन प्रा. मोहन खडसे यांनी केले. याप्रसंगी राजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि सामजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.