मांसाहारी पदार्थ खाताहात, सावधान..!

By Admin | Updated: September 4, 2015 23:02 IST2015-09-04T23:02:10+5:302015-09-04T23:02:10+5:30

युवतीच्या नाकाद्वारे काढला २५ सें.मी. लांबीचा कृमी.

Consuming non-vegetarian stuff, be careful ..! | मांसाहारी पदार्थ खाताहात, सावधान..!

मांसाहारी पदार्थ खाताहात, सावधान..!

अकोला : अकोल्यातील एका युवतीच्या शरीरातील तब्बल २५ सें.मी. लांबीचा कृमी नळीच्या साहाय्याने नाकाद्वारे काढण्यात आला. २९ ऑगस्ट रोजीची ही घटना असून, कृमीची उत्पत्ती अर्धवट शिजलेल्या मांसाहारी पदार्थाच्या सेवनामुळे झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अकोल्यातील जुने शहरातील एका १७ वर्षीय युवतीने विष प्राशन केल्याने तिला शनिवार, २९ ऑगस्ट रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विष प्राशन केल्याने तिची प्रकृती चिंताजनक होऊ लागली. युवतीचे प्राण वाचविण्यासाठी तिच्या शरीरात नाकाद्वारे नळी टाकण्यात आली. नळीद्वारे विष बाहेर काढत असताना डॉ. प्रशांत वानखडे यांना नळीमध्ये कृमी आढळून आला. हा कृमी २५ सेंटिमीटर लांबीचा असून, युवतीने विष प्राषण केल्यावरही तो जिवंत असल्याने डॉक्टरांनी आश्‍चर्य व्यक्त केले. डॉक्टरांना या कृमीबाबत विचारले असता, अशा प्रकारच्या कृमीची उत्पत्ती ही मुख्यत्वे अर्धवट शिजलेल्या मांसाहारी पदार्थाच्या सेवनामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता त्या युवतीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

*कृमीची लक्षणे
अशा प्रकारचे कृमी शरीरात असल्यास भूक मंदावणे, डायरिया, वजन कमी होणे, थकवा येणे आदीलक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

*कृमी धोकादायक
अर्धवट शिजवलेले मांसाहारी पदार्थ किंवा अस्वच्छ ठिकाणचे खाद्यपदार्थ सेवनामुळे मानवी शरीरात कृमींची निर्मिती होते. ऐरव्ही अशा प्रकारचे कृमी गुदद्वारे निघतात; परंतु या कृमींचा शरीरात विकास होत गेल्यास त्यांचा आकार वाढू लागलो. कृमीचा आकार जसजसा वाढत जातो तसतसा शरीरासाठी तो धोकादायक ठरू लागतो.

Web Title: Consuming non-vegetarian stuff, be careful ..!