लोणसना येथे गाव तलावाची निर्मिती
By Admin | Updated: June 25, 2017 08:26 IST2017-06-25T08:26:25+5:302017-06-25T08:26:25+5:30
ई-क्लास जमिनीवर गाव तलावाची निर्मिती करण्यात आली.

लोणसना येथे गाव तलावाची निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्ही खुर्द : कृषी समन्वयित प्रकल्प जिल्हा शाखेच्यावतीने लोणसना येथील ई-क्लास जमिनीवर गाव तलावाची निर्मिती करण्यात आली. ग्रामस्थांना पाण्याची टंचाई व जनावरांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होऊन भूजल पातळी वाढण्यास हा तलाव उपयुक्त ठरणार आहे. कृषी समन्वयित प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक नितीन गद्रे यांच्या मार्गदर्शनात शासकीय योजनेतून करण्यात आले.
फिल्ड फॅसेलिटर निखिल चावरे, जीवन घोरमोडे, मनोज मोहोड, भावेश सदांशिव, देवीदास बांगड, अनंत धारपवार, सुधाकर धोटे यांनी ५,०८० चौरस फुटांचा तलाव निर्माण केला. हा तलाव पावसाने तुडुंब भरला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी सदर गाव तलाव महत्त्वाचा ठरला आहे.