झरंडी-सावरगाव रस्त्यासह पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:55+5:302021-03-26T04:18:55+5:30
हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अकोला, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पॅकेज क्र.आर. डी. अकोला ३२, वर्ष २०१८-२०१९, कामाची ...

झरंडी-सावरगाव रस्त्यासह पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे!
हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अकोला, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पॅकेज क्र.आर. डी. अकोला ३२, वर्ष २०१८-२०१९, कामाची लांबी ८.३० की. मी. तसेच अंदाजी किंमत रुपये २९३.४६ लक्ष असून या कामाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केले होते. आता मार्च २०२१ मध्ये या रस्त्याचे काम सुरू आहे. कामाबाबत ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांना वारंवार विचारपूस केली. काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित अधिकारी डोळेझाक करीत आहे.
फोटो:
संबंधित ठेकेदारांच्या दलालामार्फत ग्रामस्थांना धमक्या
संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्यामुळे स्थानिक काही नागरिकांनी विचारणा केली असता, संबंधित ठेकेदाराच्या दलालांनी त्या नागरिकांना ॲट्रॉसिटी ॲक्ट मध्ये जेलात टाकण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
कामाबाबत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना वारंवार सांगितल्यानंतरही काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. पूल बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराला जाब विचारला तर, ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येते.
-राजेश जाधव ग्रामस्थ झरंडी
झरंडी-सावरगाव रस्त्यासह पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून कामावर वापरण्यात येणारे साहित्य अंदाजपत्रकाप्रमाणे नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे वरिष्ठांनी लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी.
- विजय कुमार ताले, तालुकाध्यक्ष प्रहार पक्ष पातूर