शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अकोल्यातील उड्डाण पुलाचे बांधकाम रखडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 4:13 PM

इलेक्ट्रिक लाइनचा सर्व्हे चुकला असून, ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनसाठी सर्व्हिस रोडवर पुरेशी जागाच नसल्याने उड्डाण पुलाचे १८ पिल्लर बांधण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विज पुरवठ्याचा सर्वे तिसऱ्यांदा चुकल्याने जिल्हा कारागृह ते अकोला क्रिकेट क्लबपर्यंतच्या उड्डाण पुलाचे बांधकाम रखडण्याची शाक्यता वर्तविण्यात येत आहे.उड्डाण पुलाच्या खालील बाजूने जाणाºया सर्व्हिस मार्गावरील पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक लाइनचा सर्व्हे चुकला असून, ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनसाठी सर्व्हिस रोडवर पुरेशी जागाच नसल्याने उड्डाण पुलाचे १८ पिल्लर बांधण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे.लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढल्याने अकोल्यात वाहतुकीची कोंडी होत असते. अकोलेकरांची या कोेंडीतून सुटका करण्यासाठी अकोल्यात उड्डाला मंजुरी देत केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये या उड्डाण पुलाचे उद्घाटन केले.तथापि साडेतीन वर्षांनंतर या कामाच्या निविदेला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबपर्यंत होणाºया एका उड्डाण पुलाच्या कामास हरियाणाच्या जान्डू कंपनीने सुरुवात केली. फ्लाय ओव्हर, एक अंडर पास आणि सर्व्हिस रोडची निर्मिती दोन वर्षांच्या आत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कंत्राटदाराने १६३.९८ कोटी रुपयांच्या खर्चातून उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. मार्च महिन्यात महावितरणकडे पोल शिफ्टिंग आणि पथदिव्यांच्या लाइनसाठी मंजुरीचे प्रस्ताव पोहोचले. यादरम्यान अधिकाऱ्यांचे तीन सर्व्हे झाले; मात्र अजूनही त्यातून तोडगा निघाला नाही. सप्टेंबर महिन्यात पुलाचे २२ पिल्लर उभे करण्यात आले. तथापि कामाचा वेग कमी आहे. उर्वरित १८ पिल्लरच्या बांधकामासाठी अडसर निर्माण झाला आहे. टॉवर चौकातील ६ क्रमांकाचा, जनता बाजाराजवळील १२ क्र मांकाचा आणि मुख्य टपाल कार्यालयाजवळील २२ क्रमांकाच्या पिल्लरचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. भूमीगत विजपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु बांधकाम कंत्राटात ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन आहे. इलेक्ट्रिक लाईनचा हा सर्व्हेच चुकल्याने आता हे काम मध्येच थांबले आहे. यामध्ये महावितरण, राष्ट्रीय प्राधिकरणाकडे आणि प्राधिकरण महावितरणाकडे बोट दाखवित आहे. त्यात बांधकाम आणि इलेक्ट्रिक कंत्राटदारांची कोंडी झाली आहे.सध्या असलेल्या सर्व्हेनुसार जागेअभावी काम होत नाही. अन् भूमीगत विजपुरवठ्याचे काम केले तर त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च वाढत आहे. हे काम वाढल्याने कंत्राटदार कंपनीने दिलेल्या बजेटमध्ये काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जागेअभावी सुरूच झाले नाही दुसरे उड्डाण पूलएनसीसी-महाराष्ट्र राज्य बटालियनचे कार्यालयापासून तर निमवाडीपर्यंत दुसºया उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू होणार होते; मात्र येथे देखील जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने बांधकामाला सुरुवात केलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता कधी जागा मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महावितरण कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, उड्डाण पुलाचे कंत्राटदार यांचा संयुक्त सर्व्हे तीनदा झाला. तेव्हा इलेक्ट्रिक लाइन ओव्हरहेडसाठी जागा कशी होती, जर सर्व्हे चुकला असेल तर महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी पुन्हा तसा अहवाल पाठवावा. वरिष्ठांकडे पाठपुरावा करून मार्ग काढता येईल.-विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती.

टॅग्स :Akolaअकोला