अकोल्यातील १५२ इमारतींचे बांधकाम अवैध
By Admin | Updated: June 5, 2014 01:32 IST2014-06-05T01:30:58+5:302014-06-05T01:32:33+5:30
अकोला मनपाची कारवाई; १५२ इमारतींचे बांधकाम अवैध असल्यावर शिक्कामोर्तब

अकोल्यातील १५२ इमारतींचे बांधकाम अवैध
अकोला : शहरात अनधिकृत बांधकाम करणार्या तब्बल १५२ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देण्याची प्रक्रिया बुधवारी संपुष्टात आली. या प्रकरणी महापालिकेच्यावतीने पुन्हा ३८ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या. १५२ पैकी कोण्याही इमारतीला दुप्पट दंड आक ारून त्यांना नियमित करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे यापूर्वी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केल्याने बांधकाम पाडण्याच्या संभाव्य कारवाईने अनेकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. बांधकाम व्यवसायामुळे शहरातील विकास कामांना चालना मिळाल्याचे कोणीही नाकारत नाही. शहराचे र्मयादित भौगोलिक क्षेत्र व आकाशाला भिडणारे जमिनीचे भाव पाहता, जागा विकत घेऊन त्यावर घर बांधण्याचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न केव्हाचेच भंगले आहे. साहजिकच, नोकरपेशा वर्गाने फ्लॅट संस्कृतीला आपलेसे केले आहे. ही गरज लक्षात घेता, बांधकाम व्यावसायिकांनी रहिवासी इमारती उभारण्याचे काम हाती घेतले. शहराच्या कानाकोपर्यात अशा असंख्य इमारती डौलाने उभ्या असून, काही निर्माणाधिन आहेत. परंतु इमारतींचे निर्माण करताना बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष करीत मंजूर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले. ही बाब गंभीरतेने घेत, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अनधिकृत बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली. शहरातील १५२ निर्माणाधिन इमारतींचे मोजमाप घेण्यात आल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पुन्हा नोटीस पाठवल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील ३८ नोटीस बुधवारी जारी करण्यात आल्या.