इंगळे कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:20+5:302021-02-05T06:18:20+5:30

‘नारीशक्ती सेवा फाऊंडेशन’चे उद्घाटन अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयातील नारी सेवा फाऊंडेशनचे उद्घाटन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ...

Consolation from the Guardian Minister for the Ingle family | इंगळे कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

इंगळे कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

‘नारीशक्ती सेवा फाऊंडेशन’चे उद्घाटन

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयातील नारी सेवा फाऊंडेशनचे उद्घाटन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. संजय खडक्कार, प्रबंधक अशोक चंदन, आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. आशिष राऊत, डॉ. जी. व्ही. कोरपे, प्रा. संजय काळे, प्रा. दत्तकुमार भारसाकळे, एकनाथ उपाध्ये, राजाभाऊ देशमुख, शौकत अली शौकत तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवर्ग व विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या शैलीमध्ये उपस्थितांना कविता ऐकवून मंत्रमुग्ध केले. प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा प्रवास सांगितला. फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुम्मिया सुमैया अली यांनी फाऊंडेशनबद्दल सविस्तर माहिती दिली. ना. कडू यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. आनंदा भिकूजी काळे व डॉ. अर्चना पेठे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या सिनिअर अंडर ऑफिसर आनंद भगत, साक्षी नवलकर, श्रीमती मळसने, शरद गावंडे, वंदना पेठे, श्रीकांत देशमुख, उत्कृष्ट वक्ता विद्यार्थी योगेश राऊत, विद्यार्थिनी यत्री देशमुख, सर्वोत्कृष्ट खेळाडू गौतम रामटेके, अचल वासनिक, ऋषिकेश इंगळे, आकांक्षा गोमासे, सचिन अरुण काळे, आनंदा भगत, साक्षी नवलकार, सुजित किरण खंडारे, शिवानी राजेंद्र काळे, वंशिका दिनेश पाडिया व कल्याणी विखे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करण्यात आला. एनसीसी प्रमुख व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंदा काळे यांनी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन केले.

Web Title: Consolation from the Guardian Minister for the Ingle family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.