अकोला मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

By Admin | Updated: April 1, 2016 00:52 IST2016-04-01T00:52:19+5:302016-04-01T00:52:19+5:30

अंतर्गत गटबाजीला आळा घालण्यासाठी पक्षातील दुसरी फळी सरसावली; मोर्चेबांधणीसाठी गुप्त बैठकांचे आयोजन.

Congress's frontline for Akola Municipal Elections | अकोला मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

अकोला मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

आशीष गावंडे/अकोला
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गटबाजीचे परिणाम दीड वर्षांनंतरही कायम असल्याचे महापालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत दिसून आले. तोंडावर आलेली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन अंतर्गत गटबाजीला आळा घालण्यासाठी पक्षातील दुसरी फळी सरसावली असून मोर्चेबांधणीसाठी गुप्त बैठका घेतल्या जात असल्याची माहिती आहे.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्ह्यात गत काही वर्षांपासून पक्षाची अत्यंत खडतर वाटचाल सुरू आहे. नव्या दमाच्या आणि जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परिणामी निष्ठावान कार्यकर्ते पक्षापासून दुरावल्याची स्थिती आहे. दीड वर्षांपूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विजय देशमुख यांना अकोला पश्‍चिम विधानसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांनी वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. साहजिकच त्यांच्या पाठोपाठ इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसक डे पाठ फिरवली. पक्ष सोडून राष्ट्रवादीची वाट धरणार्‍या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र, स्वत:ची प्रतिमा उजळ ठेवण्यापलीकडे स्थानिक नेते, पदाधिकार्‍यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. साहजिकच, विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांचे परिणाम अद्यापपर्यंत कायम असल्याचे मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीत दिसून आले. ह्यस्थायीह्णच्या निवडणुकीत ऐनवेळेवर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानाला दांडी मारली. याचे परिणाम दोन्ही नगरसेवकांना भोगावे लागत असले तरी हीच परिस्थिती आगामी नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उद्भवण्याची दाट शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते सरसावले आहेत. अंतर्गत कलह-गटबाजीला थोपवणे आणि जुन्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा प्लानह्णआखल्या जात आहे.

Web Title: Congress's frontline for Akola Municipal Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.