काँग्रेसची धुरा देणार तरुणांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:51+5:302021-03-27T04:18:51+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरू केले असून आतापर्यंत तीन वेळा रद्द झालेली बैठक अखेर ...

काँग्रेसची धुरा देणार तरुणांच्या हाती
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरू केले असून आतापर्यंत तीन वेळा रद्द झालेली बैठक अखेर गुरुवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत अकाेला शहर व जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थितांची मते जाणून घेतल्यानंतर पटाेले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अकाेल्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी कार्यकारणीत बदल करण्याची गरज आहेच. मात्र येणाऱ्या काळात नव्या नेतृत्वाच्या व तरुणांच्या हाती काँग्रेसची सूत्रे दिली जातील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चाैधरी प्रदेश प्रवक्ता डाॅ. सुधीर ढाेणे, साजीद खान, पठाण, संजय बाेडखे, अविनाश देशमुख, प्रकाश तायडे, महेश गणगणे, बद्रुजम्मा डाॅ. काेरपे, सुरेश पाटील, मदन भरगड, साजीद पठाण, निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, पराग कांबळे, भूषण गायकवाड, आकाश शिरसाट, पुष्पा देशमुख, विभा राऊत, इरफान, मब्बा पहेलवान, तश्वर पटेल, प्रदीप वखारिया अविनाश देशमुख, सागर कावरे मो. युसूफ आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
स्वबळावर तयारी करा
राज्यातील सत्तेमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी करावी, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेपर्यंत पाेहचवण्याचे काम काँग्रेसने करावे, असे निर्देश पटाेले यांनी दिले.
बाॅक्स
गटबाजी नकाे अध्यक्षांना सहकार्य करा
महानगर व जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्या अध्यक्षांच्या विराेधात गटबाजीचे राजकारण नकाे. नव्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करून काँग्रेसची ताकद वाढवा, काेणत्याही प्रकारची गटबाजी पक्षात खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी देत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आत्मविश्वासाने निवडणुकीची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केेले.