शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ‘मराठा कार्ड’ खेळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:42 IST

अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा कार्डच्या माध्यमातून व्यूहरचना आखली जात आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आघाडीवर अद्याप एकमत झाले नसल्याने काँग्रेसच्या गोटात संभाव्य उमेदवारांच्या नावावर खलबते सुरू आहेत. खा. संजय धोत्रे यांना कडवी झुुंज देण्याच्या उद्देशातून काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे यांच्या नावावर चर्चा होत आहे.शिवसेना-भाजपमध्ये युती न झाल्यास, अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप व सेनेचा आमना-सामना पाहावयास मिळेल.

- आशिष गावंडे

अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा कार्डच्या माध्यमातून व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने काँग्रेसमध्ये अभय पाटील व प्रशांत गावंडे यांच्या नावावर खलबते सुरू असून, शिवसेनेमध्ये माजी आ. गजानन दाळू गुरुजी व विजय मालोकार यांचा विचार सुरू आहे. शिवसेनेत विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याही नावावर विचार केला जात आहे, तर काँग्रेस मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या नावावरही विचार करीत आहे.लोकसभेच्या अकोला मतदारसंघात १९९८ व १९९९ मधील निवडणुकीत भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. तो कालावधी वगळल्यास १९८९ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून येते. भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर खासदार संजय धोत्रे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये आघाडीवर अद्याप एकमत झाले नसल्याने काँग्रेसच्या गोटात संभाव्य उमेदवारांच्या नावावर खलबते सुरू आहेत. खा. संजय धोत्रे यांना कडवी झुुंज देण्याच्या उद्देशातून काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे यांच्या नावावर चर्चा होत आहे. यासोबतच मनपातील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांचेही नाव चर्चिल्या जात आहे.

...तर शिवसेना-भाजप आमनेसामने!शिवसेना-भाजपमध्ये युती न झाल्यास, अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप व सेनेचा आमना-सामना पाहावयास मिळेल. शिवसेनेकडूनसुद्धा मराठा कार्डचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माजी आ. गजानन दाळू गुरुजी, विजय मालोकार यांच्या नावाचा समावेश आहे; मात्र ऐन वेळेवर विधान परिषद निवडणुकीत सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावरही जबाबदारी येऊ शकते. त्यासाठी तयार राहण्याची सूचना त्यांना पक्षाने दिल्याची माहिती आहे. 

काँग्रेसच्या उमेदवारावर धाबा गावात मंथनशहरात ७ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमीत्त पक्षात पडद्याआड अनेक हालचाली झाल्या. ८ डिसेंबर रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावात लोकसभेच्या संभाव्य उमेदवारावर मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसमधील निवडक ज्येष्ठ नेते, युवा नेत्यांची उपस्थिती होती. 

२०१४ मध्ये भाजपाचा एकतर्फी विजयएप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे यांना ४ लक्ष ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लक्ष ५३ हजार ३५६ मते तसेच भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लक्ष ३८ हजार ७७६ मते मिळाली होती. यंदा काँग्रेस व शिवसेनेने निवडणुकीत मराठा उमेदवार उभा केल्यास  चुरस पाहावयास मिळेल. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Dhotreसंजय धोत्रे