शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अकोल्यात काँग्रेसला प्रभावी उमेदवाराचा शोध; भारिपसोबत आघाडीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 6:15 PM

कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती.अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे.

- राजेश शेगोकार अकोला : लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. ती साथ मिळाली असती, तर १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीला मिळालेले यश कदाचित पुन्हा एकदा मिळविता आले असते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे. अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक ठरते, असा आरोप काँगे्रसच्या गोटातून नेहमीच होता. त्या आरोपाला उत्तर देताना अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘काँग्रेसला मोठे करणे ही माझी जबाबदारी नाही’ असे अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.वसंतराव साठे यांच्यासारख्या आयात उमेदवारालाही दोन वेळा खासदार करणारा अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी असे म्हणण्याचे कारण म्हणजे, याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणेही कठीण झाले आहे. स्व. नानासाहेब वैराळे हे १९८४ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे खासदार, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपाला सहा वर्षांची विश्रांती देण्यात यश आले; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच, हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसच्या ‘हाता’तून एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.या सर्व पृष्ठभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन काँग्रेस भाजपाच्या विजयी रथाला थांबवायचे मनसुबे आखत होते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनीच ‘एमआयएम’सोबत आघाडी केल्याने काँग्रेसपुढे उमेदवार निवडीचेच आव्हान आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९