कॉँग्रेस-राकाँची कुरघोडीत ‘आघाडी’!

By Admin | Updated: August 31, 2014 01:17 IST2014-08-31T01:14:45+5:302014-08-31T01:17:05+5:30

आज कॉँग्रेसकडूनही उर्वरित जागांसाठी मुलाखती; मूर्तिजापूरचा समावेश.

Congress-Rakanchi slogan 'lead'! | कॉँग्रेस-राकाँची कुरघोडीत ‘आघाडी’!

कॉँग्रेस-राकाँची कुरघोडीत ‘आघाडी’!

अकोला : राष्ट्रवादी कॉँग्रेसने विधानसभेच्या २८८ जागांसाठी मुलाखती घेतल्याने आता कॉँग्रेसनेही स्वबळावर लढण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. यापूर्वी १७४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता रविवारी उर्वरित ११४ जागांसाठी मुलाखतीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्यावर असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे जागा वाटपावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकमेकांवर कुरघोडीत कशी ह्यआघाडीह्ण घेता येईल, यासाठीच प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी कॉँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. जिल्हा कॉँग्रेस कमिटीने पाचही मतदारसंघांसाठी एकूण ७२ अर्ज पाठविले. १७ ऑगस्ट रोजी अकोला पूर्व व पश्‍चिम, आकोट आणि बाळापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक मुलाखती कॉँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या नाहीत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये आकोट ७, बाळापूर ५, अकोला पूर्व ४, अकोला पश्‍चिम १७ व मूर्तिजापूर या मतदारसंघासाठी प्रत्येकी अर्ज केले होते. त्यानुसार गत आठवड्यात मुंबई येथे इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने १४४ जागांची मागणी रेटून धरली. कॉँग्रेसने ही मागणी मान्य केली नाही.
त्यामुळे दबावतंत्राचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच २८८ जागांसाठी मुलाखती घेतल्या. परिणामस्वरूप कॉँग्रेसनेही सर्वच जागांसाठी मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, बाळापूर आणि आकोट हे पाच मतदारसंघ कॉँग्रेसच्या तर मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्यावर आहे. मात्र, आता कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरूच असल्याने इच्छुक धास्तावलेले आहेत.

Web Title: Congress-Rakanchi slogan 'lead'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.