सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

By Admin | Updated: March 5, 2017 01:45 IST2017-03-05T01:45:46+5:302017-03-05T01:45:46+5:30

अशोक वाटिका चौकात ‘चुल्हा जलाओ’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

Congress movement against the cylinders | सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

अकोला, दि. ४- गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी अकोला लोकसभा युवक काँग्रेस व महिला काँग्रेस यांच्यावतीने शनिवारी येथील अशोक वाटिका चौकात ह्यचुल्हा जलाओह्ण हे अभिनव आंदोलन करण्यात आले. अँड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकार्‍यांनी अशोक वाटिका चौकात चुली पेटवून त्यावर बेसन-भाकर व चहा बनविला. यावेळी युवक काँग्रेव व महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी चहा व बेसन-भाकरचा चौकातच आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन अकोला पश्‍चिम विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव खिजर अ. खान यांनी केले होते. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, शहर अध्यक्षा सुषमा निचळ, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव वर्षा बडगुजर, नगरसेवक पराग कांबळे, सै. अजहरुद्दीन, गणेश कळसकर, चेतन कोंडाणे, सागर कावरे, शेख अब्दुल्लाह, राहुल थोटांगे, विशाल इंगळे, सै. शहजाद, राजेश पाटील, कशीश खान आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वप्निल काटकर, रब्बानी शाह, राजेश तेलगोट, शे. इरफान, आकाश कांबळे, आकाश माळी, आदित्य देशमुख, दिनेश टोबरे, राम पाचपोर, राजकुमार सिरसाट, विजया राजपूत, इंदुबाई पैठणकर, चंद्रमणी दामोदर, घनश्याम दांदळे, राधेश्याम मेहंगे, कांताबाई लाडके, उषा वर्‍हाडे, आशिष सुरवाडे, निखिल तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress movement against the cylinders