शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात निवृत्त अभियंत्याची धारदार शस्त्राने हत्या; मृत व्यक्तीच्याच इमारतीमध्ये राहत होता आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:03 IST

अकोल्यात माजी अभियंत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Akola Crime: काँग्रेस नेत्याच्या भावाच्या हत्येने अकोल्यात खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर आलेल्या एका गुंडाने माजी अभियंता असलेल्या व्यक्तीची भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या केली. जुन्या वादातून हा सगळा प्रकार घडला असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज व्हायरल होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सोमवारी रात्री अकोल्यातील रणपिसे नगर येथील मुरलीधर टॉवर येथे ६० वर्षीय निवृत्त अभियंता संजय कौशल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या  थरारक हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली. संजय कौशल हे अकोल्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय कौशल यांचे लहान बंधू असून ते सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या महेंद्र विश्वासराव पवार नावाच्या व्यक्तीने संजय कौशल यांची हत्या केली. महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून एका प्रकरणात जामीनावर बाहेर असतानाच त्याने कौशल यांची हत्या केली.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी महेंद्र पवार याने संजय कौशल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी शस्त्राने हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले. या भयानक घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. घटनेची माहिती मिळताच अकोला शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन विशेष पोलिस पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

दरम्यान, आरोपी महेंद्र पवार हा यापूर्वीही खुनी हल्ला आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे. नुकतेच त्याला कोर्टातून एका प्रकरणातून जामिनावर सोडण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे मृत संजय कौशल आणि आरोपी पवार दोघेही मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते. या हत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस