अकोला मनपासमोर काँग्रेसची निदर्शने

By Admin | Updated: January 21, 2015 01:00 IST2015-01-21T01:00:29+5:302015-01-21T01:00:29+5:30

विकासकामे सुरू करण्याची मागणी.

Congress demonstrations in Akola Manaspatam | अकोला मनपासमोर काँग्रेसची निदर्शने

अकोला मनपासमोर काँग्रेसची निदर्शने

अकोला : तत्कालीन काँग्रेस सरकारने शहर विकासासाठी दिलेल्या १0७ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात प्रशासन व सत्ताधारी भाजप-शिवसेना जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.
रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अकोलेकर प्रचंड वैतागले असताना प्रशासनाने विकासकामे सुरू करण्यासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील बहुतांश पथदिवे नादुरुस्त आहेत. रस्त्यांवर प्रचंड धूळ, साफसफाईअभावी घाणीने गच्च भरलेल्या नाले-गटारे व जलवाहिन्यांमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी पाहता, मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजप-शिवसेना अकोलेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर मदन भरगड यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांंनी प्रशासन व सत्ताधार्‍यांच्या विरोधात निदर्शने केली. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा, शेतकर्‍यांना आर्थिक मदत घोषित करा, नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदी रद्द करीत मनपाला प्राप्त झालेल्या १0७ कोटींची विकासकामे त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मनपाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Congress demonstrations in Akola Manaspatam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.