पक्षांचा गोंधळ..मतदारांची परीक्षा

By Admin | Updated: September 28, 2014 23:22 IST2014-09-28T23:22:49+5:302014-09-28T23:22:49+5:30

बदलते राजकारण : एकपक्षीय सरकार निवडण्याची पुन्हा संधी.

Confusion of the parties. Examination of the voters | पक्षांचा गोंधळ..मतदारांची परीक्षा

पक्षांचा गोंधळ..मतदारांची परीक्षा

राजेश शेगोकार / बुलडाणा
युती व आघाडीच्या राजकारणामुळे तडजोडीची भूमिका घेत काम करणार्‍या सरकारला अनेक अडचणी येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या अनेकदा जाहीरपणे व्यक्तही झाल्या; मात्र तरीही सं ख्येचे गणित जुळविण्यासाठी अशा आघाड्या किंवा युती करणे राजकीय अपरिहार्यता ठरली होती. यावेळी मात्र प्रत्येक पक्ष आपले बळ आजमावण्यासाठी मैदानात उतरला आहे. फक्त मैदानात उ तरण्याची वेळ ही शेवटच्या क्षणी आल्याने ही घटका आपल्यासाठी अंतिम ठरू नये म्हणून प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडताना चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळामध्येच आता पुढील पंधरा दिवस निघून जातील, निकाल जरी उमेदवारांचा लागणार असला तरी ही निवडणूक मतदारांची परीक्षा ठरणार असून, एक पक्षाचे सरकार निवडणण्याची संधीही मिळणार आहे.
बुलडाण्यातील सातही मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. सेनेच्या इंजिनाला केवळ चार डब्बेच लागले तर भारिप-बमस, बसपा यांनीही उमेदवार उभे करून आपले आव्हान कायम ठेवले. या पृष्ठभूमीवर उद्याची होणारी निवडणूक ही मतदारांना अधिक पर्याय उ पलब्ध करून देणारी निवडणूक ठरली आहे.
१९९९ मध्ये केवळ आघाडी स्वतंत्र होती युती कायम होती, मनसेचा उदय नव्हता, भारिप-बमसचा पॅर्टन नुकताच गाजू लागला होता, यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत नगण्य स्थान असून, युती-आघाडी फुटल्यामुळे अशा अपक्षांना आता पक्षांचा पर्याय मिळाला आहे.
मोदी लाटेत भारत जिंकणार्‍या भाजपाला पोटनिवडणुकीत मात्र हार मानावी लागली म्हणून मोदी लाट ओसरली असा दावा काँग्रेसमधून होऊ लागला. त्या दाव्यात किती सत्यता होती, याचाही निकाल या निवडणुकीत हाती लागणार आहे. पक्षांच्या या भाऊगर्दीमध्ये मतदार हरवून जातो की म तांचे राजकारण करणार्‍यांना हरवितो हे पाहणे औत्सुक्त्याचे आहे. कारण आता मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे, मोदी लाटेने ते दाखवून दिले त्यामुळे उमेदवारांना सावध व्हा कारण ..ये पब्लिक है..!

Web Title: Confusion of the parties. Examination of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.