दुर्गवाडा येथे ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:22+5:302021-01-13T04:47:22+5:30
दुचाकीसह प्रतिबंधित गुटखा जप्त मूर्तिजापूर : दहशतवाद विरोधी पथक मूर्तिजापूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक व्यक्ती दुचाकीवरून अवैध ...

दुर्गवाडा येथे ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता
दुचाकीसह प्रतिबंधित गुटखा जप्त
मूर्तिजापूर : दहशतवाद विरोधी पथक मूर्तिजापूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक व्यक्ती दुचाकीवरून अवैध प्रतिबंधित गुटखा वाहून नेत असल्याची माहिती मिळाली. यावरून दुचाकी (क्र. एमएच ३० बीजी ९६१७) अडवून दुचाकीवरून वाहून नेण्यात येत असलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व पानमसाल्याचे ५० पाकिटे व गुटखा असलेल्या तीन बॅग किंमत सात हजार ५०० रुपये व ५० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा ७५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. (फोटो)
------------------------------------------
डी.फार्म पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
मूर्तिजापूर : डी. फार्म पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी शुक्रवारी कट ऑप दिनांकाची मुदत वाढवून १५ जानेवारीपर्यंत केली. त्यामुळे अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.