इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:45 PM2019-07-29T15:45:32+5:302019-07-29T15:46:07+5:30

अकोला : महावितरणच्या पायाभूत आराखडा टप्पा -२ (इन्फ्रा-२) या सुमारे ८५ कोटी रूपयाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा वीज उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली.

Completion of work of power stations in the Akola district under Infra-2 | इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास

इन्फ्रा-२ अंतर्गत अकोला जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रांची कामे पूर्णत्वास

Next


अकोला : महावितरणच्या पायाभूत आराखडा टप्पा -२ (इन्फ्रा-२) या सुमारे ८५ कोटी रूपयाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा वीज उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, रिधोरा उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे जिल्हयातील वीज यंत्रणेला भक्कम बळकटीकरण मिळाले आहे. उपकेंद्र आणि अनुशंगिक विजवाहिन्यांचे जाळे निर्माण झाल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे.
ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विद्युत यंत्रणेचे विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी पायाभूत आराखडा टप्पा -२ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली. या योजनेच्या कामासाठी तीन कंत्राटदारांशी करार केल्यानंतर फेब्रुवारी २०१५ नंतर या योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली.
या योजनेअंतर्गत ८४ कोटी ९१ लक्ष खर्च करून या योजनेत जिल्ह्यातील पायाभूत सुविधेचे बळकटीकरण करताना तेल्हारा तालुक्यातील बेलखेड,सौंदळा आणि येदलापूर ,बाळापूर तालुक्यात हातरूण व रिधोरा ,अकोट तालूक्यात अकोट आणि मोहाळा ,पातूर तालुक्यात चान्नी, बाशीर्टाकळीत जलालाबाद आणि अकोला तालुक्यातील कानशिवणी आणि कौलखेड अकोला येथे ३३/ ११ के.व्ही.चे असे एकून ११ उपकेंद्रे उभारण्यात आली आहे. यासोबतच अनुशंगिक जाळे तयार करताना १३४ किमी लांबीची ३३ के.व्ही. उच्च दाब वाहीनी, तर १७३ किमी ११ के.व्ही. उच्च दाब वाहीन्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच ११४ किमी लांबीच्या लघूदाब वाहीन्याही उभारण्यात आल्या आहे. याव्यतीरिक्त ४०० नविन रोहीत्रे बसविण्यात आली असून, १३५ रोहीत्राच्या क्षमतेमध्ये वाढ ही करण्यात आल्याने तत्कालीन ग्राहक व भविष्यातील ग्राहकांना योग्य सुरळीत वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले.

६ वीज केंद्रांमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर
ग्राहकाच्या वाढत असलेल्या वीज मागणीनुसार धाबा आणि बार्शीटाकळी (ता. बाशीर्टाकळी),दुर्गवाडा(ता. मुर्तीजापूर),जीतापुर आणि रूईखेड(ता. अकोट) आणि तेल्हारा येथील मनात्री या उपकेंद्रातत ५ एमव्हीए क्षमतेचे अतीरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे. या व्यतीरिक्त पनज येथील पॉवर ट्रान्सफॉर्मरची ५ एमव्हीए वरून क्षमता वाढ करून १० एमव्हीए करण्यात आली आहे.

 

Web Title: Completion of work of power stations in the Akola district under Infra-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.