डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:37+5:302021-05-30T04:16:37+5:30
अशी आहे लसीकरणाची स्थिती उद्दिष्ट - ६,०५,३७६ (४३ टक्के) झालेले लसीकरण वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस ज्येष्ठ ...

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले!
अशी आहे लसीकरणाची स्थिती
उद्दिष्ट - ६,०५,३७६ (४३ टक्के)
झालेले लसीकरण
वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस
ज्येष्ठ - ७८,६३३ (४०टक्के) - २६१३५ (१३ टक्के)
४५ ते ६० - ८५१५७ (२१ टक्के) - २०५२६ (५ टक्के)
(१८ ते ४५ - १७,३०५)
लसीकरण प्रारंभ - १६ जानेवारी
प्रत्येक दिवशी - ४,५३०
प्रत्येक आठवड्याला - १५,०००
प्रत्येक महिन्याला - ५८०००
जून ते डिसेंबरपर्यंत -४ लाख ६ हजार लाभार्थींना लसीकरण डिसेंबरपर्यंत एकूण लसीकरण - ६ लाख ९३ हजार २०१ झालेले असेल.
डिसेंबर २०२२ पर्यंत - १३ लाख ८६ हजार ४०२
१८ पेक्षा कमी वयाचे काय? १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठी अद्याप लस जाहीर झालेली नाही. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे १४ टक्के लोकसंख्या आहे. मध्यंतरी ४५ वर्षांखालील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात केली होती. जिल्ह्यात केवळ १७,३०५ एवढ्याच लोकांना लसीचा पहिला डोस मिळू शकला. त्यानंतर लसीच्या तुटवड्यामुळे या वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले. त्यामुळे ४५ वर्षांखालील लाभार्थींचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत या गटातील लसीकरणास सुरुवात करणे शक्य नाही. या गटातील लसीकरणास सुरुवात झाली, तरी त्यांच्या लसीकरणास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
आधी १५३ केंद्रे होती, आता केवळ २५
जिल्ह्यांत लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. त्यावेळी जिल्ह्यात सुमारे ६३ लसीकरण केंद्रे होती. एप्रिल महिन्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली. मात्र, गरजेनुसार लसीचा पुरवठा न झाल्याने केवळ २५ ते ३० केंद्रांवरच लसीकरण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळेही लसीकरणाचा वेग मंदावला आहे.