अकोला जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचे सर्वेक्षण पूर्ण
By Admin | Updated: September 11, 2014 01:21 IST2014-09-11T01:21:24+5:302014-09-11T01:21:24+5:30
पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी लवकरच पाठविणार प्रस्ताव.

अकोला जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचे सर्वेक्षण पूर्ण
अकोला : जिल्ह्यातील यावर्षीच्या रेतीघाटांच्या लिलावाची तयारी जिल्हा खनिकर्म विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, या रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाकडून लवकरच राज्य पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रेतीघाटांचा गतवर्षी लिलाव करण्यात आला होता, त्याची मुदत येत्या सप्टेंबरअखेर संपुष्टात येत असल्याने, यावर्षी करावयाच्या जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची तयारी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या लिलावासाठी जिल्ह्यात २७५ रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी लिलावास योग्य जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.