गारपिटीच्या मदत वाटपाचे काम २१ जूनपर्यंत पूर्ण करा

By Admin | Updated: June 14, 2014 23:30 IST2014-06-14T22:30:35+5:302014-06-14T23:30:00+5:30

अमरावती विभागीय आयुक्त यांनी महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ‘अल्टीमेटम’ दिला.

Complete the horticulture assistance by June 21 | गारपिटीच्या मदत वाटपाचे काम २१ जूनपर्यंत पूर्ण करा

गारपिटीच्या मदत वाटपाचे काम २१ जूनपर्यंत पूर्ण करा

अकोला : गारपिटीमुळे पीक नुकसिान भरपाईपोटी जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून मदत वाटपाचे काम येत्या २१ जूनपर्यंत पूर्ण करा, असा ह्यअल्टीमेटमह्ण अमरावती विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिला.
गेल्या २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या गारपिटीमुळे जिल्हय़ातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडून जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ५७ कोटींचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ४८ कोटी ७२ लाखांच्या मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित ८ कोटींच्या मदतीचे वाटप अद्याप बाकी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. गारपीटग्रस्त संबंधित शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त करून, उर्वरित ८ कोटींच्या मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम येत्या २१ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त बनसोड यांनी संबंधित महसूल अधिकार्‍यांना दिले.
मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला असून, यासंदर्भात लोकांमध्ये जागृती करून, जिल्हय़ात मतदार याद्या पुनर्रिक्षणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. तसेच अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी येत्या २0 जून रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यानुषंगाने जिल्हय़ात करण्यात आलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यासोबतच जिल्हय़ात ई-फेरफार व ई-चावडी अभियानाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अरुण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, श्रीकांत देशपांडे, एम.डी. शेगावकर, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार दिनेश गिते यांच्यासह जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.



 

 

Web Title: Complete the horticulture assistance by June 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.