शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्‍यांची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:09 IST

अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे

ठळक मुद्देपाळा येथील आश्रमशाळेच्या कर्मचार्‍यांचा व नातेवाईकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असताना या कर्मचार्‍यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी आदिवासी प्रकल्प कार्यालयात हैदोस घातल्याची तक्रार प्रकल्प अधिकारी विनिता सोनवने यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.पाळा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर आदिवासी आयुक्तांनी या आश्रमशाळेची मान्यता रद्द केली होती. त्यानंतर येथील कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाई झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. यामध्ये सलीम मुनाफ शेख यांचे गत आठवड्यातच निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा व वडील यांच्यासह निलंबित कर्मचारी बी. व्ही. लाहुडकर, ए. एम. शेळके, के. आर. पवार, डी. आर. खरात, इ. डी. वाघ, व्ही. आर. वाघ, एस. बी. लाखे व एन. डी. अंभोरे यांनी शनिवारी अकोल्यातील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी विनिता सोनवने यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर कार्यालयात तोडफोड करीत कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. यामधील सलीम मुनाफ शेख यांचा गत आठवड्यातच मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी शाहीन परवीन सलीम शेख व त्यांचे वडील तसेच मुलगा यांचा या तोडफोडमध्ये समावेश असल्याचे सोनवने यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाळा येथील आश्रमशाळेतून निलंबित झालेल्या या कर्मचार्‍यांनी हैदोस घालून तोडफोड केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी रात्री उशिरा या कर्मचार्‍यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरkhamgaonखामगाव