३१ मार्चच्या घोळाची सभापतींची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 01:35 IST2017-04-09T01:35:37+5:302017-04-09T01:35:37+5:30

अकोट बीडीओवर मनमानीचा आरोप

Complaint against the Chairman of the March 31 meeting | ३१ मार्चच्या घोळाची सभापतींची तक्रार

३१ मार्चच्या घोळाची सभापतींची तक्रार

अकोला : अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी बर्‍याच अनियमितता केल्या असून, त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सभापती आशा एखे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे. विशेष म्हणजे, ३१ मार्चपर्यंतच्या खर्चाची माहितीही त्यांनी दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गटविकास अधिकारी तापी कामाबाबत सहकार्य करीत नाहीत. सभापती या नात्याने सांगितलेली कामे करीत नाहीत. त्यातच गंभीर बाब म्हणजे, ३१ मार्च २0१७ रोजी खर्चाचा ताळेबंद बंद करून त्याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत होणारा खर्च अद्यापही सुरू आहे. देयकांची अदायगी सुरूच आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यालयीन कामकाजाबाबतही त्यांनी घोळ केला आहे. दलित वस्ती, पंचायत विभागाच्या नस्ती सहायक गटविकास अधिकार्‍यांमार्फत सादर होणे आवश्यक असताना त्यापैकी कोणतीच नस्ती सहायक गटविकास अधिकार्‍यांकडे सादर केली जात नाही. त्यामुळे देयकांमध्ये अनियमितता असल्याची शक्यता आहे.
या प्रकाराची चौकशी करून तापी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही सभापती एखे यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: Complaint against the Chairman of the March 31 meeting