साहाय्यक पोलीस अधीक्षकांविरुद्ध तक्रार
By Admin | Updated: December 10, 2014 01:59 IST2014-12-10T01:59:33+5:302014-12-10T01:59:33+5:30
अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा आरोप.

साहाय्यक पोलीस अधीक्षकांविरुद्ध तक्रार
अकोला - नगरसेवक अजय शर्मा यांना ताब्यात घेण्यासाठी सोमवारी मध्यरात्री रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी धडकलेले अँटी गुंडा स्कॉडच्या प्रमुखांसह त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी ह्यपोलिसी गुंडगिरीह्ण केली. यावेळी महिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप नगरेसवक शर्मा यांच्या आई द्रौपदी रमेशचंद्र शर्मा यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी दिलेल्या तक्रारीत केला आहे.
शहरातील अतिक्रमण काढणे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांचे फलक हटविण्याच्या मुद्दय़ावरून महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये १३ दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे अँटी गुंडा स्कॉडचे प्रमुख डॉ. प्रवीण मुंढे व त्यांचे पथकाने ह्यनौटंकीह्ण करीत सोमवारी मध्यरात्री नगरसेवक अजय शर्मा यांना ताब्यात घेतले. घराच्या मागील दारातून काही पोलीस कर्मचार्यांनी समोरील गेटवर लाथा मारून घरात प्रवेश केला. यावेळी अजय शर्मा यांच्या आई द्रौपदी शर्मा यांनी पोलीस कर्मचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी द्रौपदी शर्मा यांना असभ्य भाषेत सुनावलयाचे तक्रारी म्हटले आहे.
पहिल्यांदा ११ वाजता आणि पुन्हा दोन तासांनंतर या पोलिसांनी असाच राडा करीत अजय शर्मा यांच्या घरातील महिलांमध्ये दहशत निर्माण केली.