लाखांच्या मदत निधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

By Admin | Updated: July 28, 2014 01:54 IST2014-07-28T01:20:24+5:302014-07-28T01:54:49+5:30

अकोला जिल्ह्यात पावसामुळे ६२ लाखांचे नुकसान.

The commissioner proposes to support lakhs of funds | लाखांच्या मदत निधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

लाखांच्या मदत निधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

अकोला : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधारमुळे घरांच्या पडझडीसह ६२ लाख ३७ हजारांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाईपोटी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या ६१ लाख ३७ हजारांचा मदत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.
गेल्या २२ व २३ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. संततधारमुळे जिल्ह्यात ७८७ घरांची पडझड झाल्याने ५९ लाख ५0 हजारांचे नुकसान झाले. तसेच लहान-मोठय़ा जनावरांचा मृत्यू झाल्याने २ लाख ८७ हजारांचे नुकसान झाले. पावसाच्या तडाख्यात एकूण ६२ लाख ३७ हजारांचे नुकसान झाले. त्यापैकी १ लाख ३७ हजारांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपद्ग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी तहसीलदार कार्यालय स्तरावर देण्यात आला; आपद्ग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला उर्वरित ६१ लाखांचा मदत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. आवश्यक असलेला निधी प्राप्त झाल्यानंतर, संबंधित आपद्ग्रस्तांना नुकसानभरपाईची मदत संबंधित तहसील कार्यालयामार्फत वितरित केली जाणार आहे.

Web Title: The commissioner proposes to support lakhs of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.