लाॅकडाऊनमुळे व्यावसायिक उघड्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:35 IST2021-02-28T04:35:45+5:302021-02-28T04:35:45+5:30
काेराेनाला अटकाव घालण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने महापालिका क्षेत्रासह अकोट आणि मूर्तिजापूर नगर पालिका क्षेत्रात ८ मार्च पर्यंत टाळेबंदी लागू ...

लाॅकडाऊनमुळे व्यावसायिक उघड्यावर!
काेराेनाला अटकाव घालण्याच्या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने महापालिका क्षेत्रासह अकोट आणि मूर्तिजापूर नगर पालिका क्षेत्रात ८ मार्च पर्यंत टाळेबंदी लागू केली. सदर आदेशात केवळ जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने रोज दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. परंतु इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने संबंधित व्यावसायिकांसमाेर आर्थिक संकट निर्माण झाले असून त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने नियाेजन करण्याची मागणी साजीद खान यांनी केली आहे. यापूर्वी प्रशासनाने ऑड-इव्हन पद्धतीचा अवलंब केला हाेता. त्याप्रमाणेच आताही निर्णय घेतल्यास व्यावसायिकांची व त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांची कुचंबणा हाेणार नाही,असे निवेदनात नमूद आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी प्रकाश तायडे , मोहम्मद युसूफ , शारीक भाई , हरीश कटारिया यासह व्यापारी उपस्थित होते.