बीजोत्पादन कार्यक्रमाचा परिणाम दिसणार येत्या खरीप हंगामात!
By Admin | Updated: March 18, 2016 01:59 IST2016-03-18T01:59:14+5:302016-03-18T01:59:14+5:30
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ८00 शेतक-यांना प्रशिक्षण.

बीजोत्पादन कार्यक्रमाचा परिणाम दिसणार येत्या खरीप हंगामात!
अकोला: शेतक-यांना स्वत: दज्रेदार बियाणे निर्मिती करण्यासाठी बीजोत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रशिक्षणावर साडेआठ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंंत ८00 शेतकर्यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, याचे परिणाम येत्या खरीप हंगामात दिसणार आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत विदर्भस्तरीय बीजोत्पादन कार्यक्रम तीन वर्षांंसाठी राबविण्यात राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हा बीजोत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत शेतकर्यांना बीजोत्पादनाची शास्त्रोक्त माहिती देण्यात येत आहे.