शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

वाळू घाटांच्या किमतीला आता जिल्हाधिकारीच देणार मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 11:44 AM

शासनामार्फत ३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील वाळू धोरण निश्चित करण्यात आले आहे.

- संतोष येलकरअकोला: शासनाच्या सुधारित वाळू धोरणात वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस विभागीय आयुक्तांनी मान्यता देण्याची तरतूद नसल्याने, यापुढे वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस मान्यता घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात वाळू घाटांच्या निर्धारित किमतीच्या प्रस्तावांना आता जिल्हाधिकारीच मान्यता देणार आहेत.१२ मार्च २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडून मान्यता प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वाळू घाटांच्या निर्धारित किमतीच्या प्रस्तावांना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांची मान्यता घेण्यात येत होती. त्यानंतर शासनामार्फत ३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील वाळू धोरण निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या सुधारित वाळू धोरणात वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस विभागीय आयुक्तांनी मान्यता प्रदान करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नमूद करण्यात आली नाही. त्यामुळे यापुढे वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस मान्यता घेण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर न करता, वाळू धोरणामध्ये नमूद तरतुदीनुसार वाळू घाटांच्या किमतीस मान्यता देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करण्यात यावी, अशा सूचना अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १७ फेबु्रवारी रोजीच्या पत्रानुसार विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम इत्यादी पाचही जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. त्यानुषंगाने वाळू घाटांच्या निर्धारित किमतीचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची गरज नसून, जिल्हाधिकाºयांकडूनच वाळू घाटांच्या निर्धारित किमतीस मान्यता देण्यात येणार आहे.शासन निर्णयानुसार यापुढे वाळू घाटांच्या निर्धारित किमतीचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. वाळू घाटांच्या निर्धारित किमतीच्या प्रस्तावांना आता जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरच मान्यता देण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू