जिल्हाधिकारी, सीईओंनी स्वत: नेला कचरा वाहून!
By Admin | Updated: January 26, 2016 02:25 IST2016-01-26T02:25:48+5:302016-01-26T02:25:48+5:30
डोंगरगाव, मासा उदेगाव येथे स्वच्छता अभियानात सहभाग.

जिल्हाधिकारी, सीईओंनी स्वत: नेला कचरा वाहून!
अकोला: ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत:च गाव झाडून काढले, नाल्या स्वच्छ केल्या आणि नंतर कचराही स्वत: वाहून नेला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवारी डोंगरगाव आणि मासा उदेगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हाभर २५ आणि २६ जानेवारी रोजी ह्यमहास्वच्छता अभियानह्ण राबविण्यात येत आहे. सोमवारी डोंगरगाव आणि मासा उदेगाव या दोन गावांमध्ये अभियान राबविले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली.