गुलाबी थंडी झाली आता बोचरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:09 IST2018-12-31T13:08:27+5:302018-12-31T13:09:34+5:30
अकोला: : थंडीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत अकोलेकरांना गारठून सोडले आहे. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अति शीतलहरसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

गुलाबी थंडी झाली आता बोचरी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: : थंडीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत अकोलेकरांना गारठून सोडले आहे. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अति शीतलहरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांत किमान तापमान ५.९ एवढे कायम राहिल्याने शनिवारसह रविवारही गारठला. चार दिवसांपूर्वी हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी आता बोचरी झाली असून, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली आहे. अकोला शहरातील गजबजलेले रस्ते सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. गजा या वादळाच्या प्रभावाने पंधरवड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. तीन दिवसांपासून तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. त्यामुळे ती असह्य झाली आहे.
४८ तासांत पारा २.३ अंश घसरला!
दिनांक तापमान
२८ डिसेंबर ८.२
२९ डिसेंबर ५.९