लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलती लागू करण्याची व अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजप सेना युतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नाही. शिवसेना याबाबत काहीही बोलायला तयार नाही म्हणून धनगर समाजाची युती शासनाने अक्षरश: दिशाभूल केल्याचे प्रतिपादन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे. त्यामुळे समाजाने एकजूट होऊन ११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बसस्थानकाजवळील सभागृहात धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिदास भदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिनकर नागे, साहेबराव पातोंड, श्रीकृष्ण साबे, डॉ. वसंतराव मुरळ, प्रा. साहेबराव सरोदे, प्रा. गजानन जोगळे, अशोक तिरकर, सुनील सरोदे, महादेव तिरकर, विलास इसळ, विनोद नागे, मोहन रोकडे, सुनील पंडित, योगीता रोकडे, श्याम अवघड, अरविंद गाढवे यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात धनगर समाजाच्या सरपंच, दस्य व सेवानवृत्त कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव तिरकर, पत्रकार प्रा. एल.डी. सरोदे, सुनील सरोदे यांचा माजी आमदार हरिदास भदे यांच्या सत्कार करण्यात आला.
युती शासनाने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे - हरिदास भदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:56 IST
लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलती लागू करण्याची व अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजप सेना युतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नाही. शिवसेना याबाबत काहीही बोलायला तयार नाही म्हणून धनगर समाजाची युती शासनाने अक्षरश: दिशाभूल केल्याचे प्रतिपादन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे. त्यामुळे समाजाने ...
युती शासनाने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे - हरिदास भदे
ठळक मुद्देधनगर समाज मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन