सफाई कर्मचार्यांचा ११ ऑगस्टपासून संप
By Admin | Updated: August 3, 2014 00:23 IST2014-08-03T00:23:51+5:302014-08-03T00:23:51+5:30
११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने अनुप खरारे यांनी स्पष्ट केले.

सफाई कर्मचार्यांचा ११ ऑगस्टपासून संप
अकोला : सफाई कर्मचार्यांचे वेतन व पेन्शन देण्याच्या मुद्यावरून प्रशासनाने घूमजाव केल्याचा आरोप करीत येत्या ११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने अनुप खरारे यांनी स्पष्ट केले. शनिवारी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी चर्चेच्या नावाखाली तीन तास ताटकळत ठेवल्याचा आरोप खरारे यांनी केला. सफाई कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन व सेवानवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन थकीत आहे. तसेच प्रशासनाने सफाई कर्मचार्यांच्या बदल्यांमध्ये राजकारण केले. या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ११ जून रोजी बैठक घेतली. त्यावेळी सफाई कर्मचार्यांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तरी देखील प्रशासन थकीत वेतन अदा करण्यास तयार नसल्याचा आरोप अनुप खरारे यांनी केला. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टपासून संप पुकारणार असल्याचे अनुप खरारे, पी.बी. भातकुले, शांताराम निंधाने, चरण उंटवाल, विजय सारवान, हरी खोडे, प्रताप झांझोटे, रमेश गोडाले, धनराज सत्याल, मदन धनजे, बबलू सारवान, सतीश पटोने, भारत सत्याल, बाबू संकत, नारायण मकोरिया, मनोज सारवान यांनी कळविले.