वर्गमित्रांनी केला उपसरपंचाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST2021-03-24T04:16:59+5:302021-03-24T04:16:59+5:30

निमा संघटनेतर्फे देशव्यापी रक्तदान शिबिर अकोट : वीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान शिबिराचे ...

Classmates felicitated Sub-Panch | वर्गमित्रांनी केला उपसरपंचाचा सत्कार

वर्गमित्रांनी केला उपसरपंचाचा सत्कार

निमा संघटनेतर्फे देशव्यापी रक्तदान शिबिर

अकोट : वीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन २३ मार्च रोजी केले होते. शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. निमा संघटना, ज्योशीबा फाउंडेशन, पिंच्याक सिल्याट असोसिएशन, गुरुवंदन सत्यशोधक बहुद्देशीय संस्था, ओझोन ग्रुप, हुसैनी ग्रुप यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निमा संघटना सचिव डॉ. धर्मपाल चिंचोळकर यांनी सांगितले.

बोर्डीच्या विद्यार्थिनीची ‘परीक्षा पे चर्चा’साठी निवड

बोर्डी : शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली संजय गुरेकार हिची मिनिस्ट्री ऑफ एज्यूकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ विषयावर आयोजित परिसंवादात पंतप्रधान महोदयांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याकरिता निवड झाली आहे. रूपाली गुरेकारच्या यशाबद्दल तिचे प्राचार्या श्रीमती धुळे, उपप्राचार्य अतुल म्हैसने, पर्यवेक्षक सावरकर, संजय वालशिंगे, अंजली गावंडे, रश्मी गावंडे यांनी कौतुक केले.

Web Title: Classmates felicitated Sub-Panch