कवठा येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:24 IST2017-07-19T01:24:09+5:302017-07-19T01:24:09+5:30

उरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे जुन्या वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Clash in two groups at Kawtha | कवठा येथे दोन गटात हाणामारी

कवठा येथे दोन गटात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे जुन्या वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
कवठा येथील शब्बीर शाह जमशेद शहा यांनी उरळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्जुनसिंग डाबेराव, दानसिंग डाबेराव आणि बेनसिंग डाबेराव यांनी जुन्या वादातून माझा भाऊ फारुक शाह, शब्बीर शहा व इतरांबरोबर वाद घातला, तसेच लोखंडी पाइप, काठीने मारहाण केली. या मारहाण फारुक शहा व शब्बीर शहा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Clash in two groups at Kawtha