खदानमध्ये हाणामारी; एक जखमी
By Admin | Updated: April 27, 2015 01:42 IST2015-04-27T01:42:24+5:302015-04-27T01:42:24+5:30
खदान पोलिसांनी केला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

खदानमध्ये हाणामारी; एक जखमी
अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिरा बावडी येथील एका इसमास मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झिरा बावडी येथील रहिवासी अक्रम बेग इमाम बेग यांचा लहान भाऊ व पुतण्या या दोघांना मो. अकील मो. साहेल व त्याच्या साथीदाराने रविवारी मारहाण केली. या प्रकरणी अक्रम बेग इमाम बेग यांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मो. अकील मो. सोहेल व त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.