अकोला मनपाच्या ‘स्वच्छतादूत’ला नागरिकांची नकारघंटा
By Admin | Updated: March 15, 2016 02:31 IST2016-03-15T02:31:03+5:302016-03-15T02:31:03+5:30
नगरसेवकही पेचात; प्रशासनाने लागू केले दर.

अकोला मनपाच्या ‘स्वच्छतादूत’ला नागरिकांची नकारघंटा
अकोला: घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने ह्यस्वच्छतादूत आपल्या दारीह्ण ही अभिनव संकल्पना सुरू केली. स्वयंरोजगार तत्त्वावर नियुक्त केलेले सफाई कर्मचारी कचरा गोळा करण्याच्या बदल्यात नागरिकांजवळून प्रत्येकी १0 रुपये, ३0 रुपये आणि व्यावसायिकांकडून २00 रुपये मासिक शुल्क जमा करतील. काही प्रभागांमध्ये शुल्क वसुली सुरू असली तरी या प्रकाराला नागरिकांची नकारघंटा असल्यामुळे नगरसेवकांपुढे ह्यइकडे आड, तिकडे विहीरह्ण अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरात साचणार्या कचर्यामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिवाळीमध्येच कचरा गोळा करण्यासाठी ३६ अँपे वाहनांची खरेदी केली. प्रत्येक प्रभागात एक वाहन तैनात करण्यात आले. या वाहनांवर मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचारी गुंतत असल्याचे पाहून यापूर्वी घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणार्या खासगी वाहकांनाच अँपेवर स्वयंरोजगार तत्त्वावर नियुक्त करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. यामधील अनेकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन, त्यांना परवानेसुद्धा काढून देण्यात आले. वाहनांची संख्या कमी पडत असल्याने पुन्हा नवीन ४५ वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याप्रमाणे शहरात ८१ वाहनांद्वारे प्रभागनिहाय कचरा गोळा केला जाईल. ह्यस्वच्छतादूत आपल्या दारीह्ण या संकल्पनेनुसार घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या बदल्यात नागरिकांजवळून मिळणार्या पैशांतून संबंधित चालकाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होईल, हा प्रशासनाचा उद्देश आहे. याशिवाय यामुळे मनपा आस्थापनेवरील कर्मचार्यांना इतर सेवांमध्ये नियुक्त करता येईल. याकरिता प्रशासनाने साधे मातीचे-टिनपत्र्याचे घर असल्यास संबंधित नागरिकाकडून दहा रुपये, पक्के स्लॅबच्या घराकरिता ३0 रुपये आणि हॉटेल व्यावसायिकांना मासिक २00 रुपये शुल्क देणे बंधनकारक केले. सद्यस्थितीत ही शुल्कवसुली सरसकट सर्वच प्रभागांमध्ये होत नसल्याने मनपाच्या ह्यस्वच्छतादूतह्णला पैसे देण्यावरून नागरिकांची नकारघंटा ऐकावयास मिळत आहे.