सिटी राउंडअप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:18 IST2021-09-13T04:18:22+5:302021-09-13T04:18:22+5:30
शहरातील सर्वच प्रमुख चाैकांमध्ये माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे अशा चाैकांमधून वाहने चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे़ ...

सिटी राउंडअप
शहरातील सर्वच प्रमुख चाैकांमध्ये माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे अशा चाैकांमधून वाहने चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे़ या चाैकांमधील अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत करावी़ शहरातील काैलखेड चाैकात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे़ तर याच ठिकाणावरून बसेसही माेठ्या प्रमाणात जातात त्यामुळे अपघाताची शक्यता आहे़ तर तुकाराम चाैक, नेहरू पार्क चाैक, सिंधी कॅम्प चाैक, अशाेक वाटिका चाैकातील पुलाखालीही माेठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे़ जयहिंद चाैक, श्रीवास्तव चाैकातही भाजी बाजारातील दुकानदार रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला खाेळंबा हाेत आहे़ तर वाशिमकडे जाणाऱ्या बायपास चाैकातही माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे़ अशीच परिस्थिती जठारपेठ चाैकातील असून शहरातील गांधी चाैक, दीपक चाैक, आकाेट स्टॅन्ड परिसरातही वाहतूक विस्कळीत हाेत आहे़ या प्रत्येक चाैकातील अतिक्रमण काढून तेथील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे़
माेहन बढे