नगर वकील संघ ठरला अॅडव्होकेट चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:13 IST2018-11-26T16:12:21+5:302018-11-26T16:13:18+5:30
अकोला : अॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नगर संघाने अंबाजोगाई संघाला नमवित अॅडव्होकेट ...

नगर वकील संघ ठरला अॅडव्होकेट चषकाचा मानकरी
अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नगर संघाने अंबाजोगाई संघाला नमवित अॅडव्होकेट चषकावर ताबा मिळविला. रविवारी स्पर्धेचा समारोप झाला.
नगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नगर संघाने २० षटकात १४७ धावा काढल्या. यामध्ये आनंद फडके याने नाबाद दमदार ७५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात अंबाजोगाई संघ केवळ ७५ धावा काढून गारद झाला. अजित लोमटे याने २० आणि पृथ्वीराज कदम याने १४ धावा काढल्या. या सामन्यात भारत रासकर गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तब्बल ५ गडी बाद केले. अभिजित देशपांडे, बबन सरोदे, विशाल कांबळे यांनीदेखील गोलंदाजीचे सुंदर प्रदर्शन केले. सामनावीरचा पुरस्कार आनंद फडके याला देण्यात आला. स्पर्धेत मॅन आॅफ दि सीरिज पुरस्कार भरत रासकर, बेस्ट फिल्डर अनिल लोमटे, बेस्ट कॅचर अजय लोंढे, बेस्ट बॉलर नवाज पठाण तर बेस्ट किपरचा पुरस्कार अतुल सराग याने पटकाविला. नगर संघाला स्पर्धेचे विजेतेपद बहाल करण्यात आले. अंबाजोगाई संघ उपविजेता ठरला. तृतीय स्थान अकोला ‘अ’ तर चतुर्थस्थानी अकोला ‘ब’ संघ राहिला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला अॅड़ अलीमुद्दीन शेख, अॅड़ राहुल मुंडे, अॅड़ रवी हिराणी, अॅड़ यशवंत दुदुस्कर, अॅड़ विवेकानंद जगदाळे, अॅड़ राजेश देशमुख, अॅड़ भूषण काळे, अॅड़ आनंद गोदे, अॅड़ प्रवीण कडाळे, अॅड़ रू पेश इस्तापे, अॅड़ अजित देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.