अकोला शहरात गावगुंडांचा धुडगूस

By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:30:47+5:302014-08-01T02:23:01+5:30

तीन बस गाड्यांसह वाहनांची तोडफोड

In the city of Akola, the villagers' havoc | अकोला शहरात गावगुंडांचा धुडगूस

अकोला शहरात गावगुंडांचा धुडगूस

अकोला- मध्यवर्ती बसस्थानक चौकात गुंडप्रवृत्तीच्या एका सशस्त्र टोळीने गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास धिंगाणा घातला. तोंडावर कापड बांधून आलेल्या या टोळक्याने तीन बसेससह शहर वाहतूक सेवेची एक बस, एक ट्रक व एका जी पवर दगडफेक करीत लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली. १0 ते १५ मिनिट घातलेल्या या हैदोसामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुधवारी मध्यरात्रीपासून हा हैदोस सुरू असून दोन ज्वेलर्स व महापालिकेच्या इमारतीवरदेखील अशाच प्रकारची दगडफेक बुधवारी रात्री करण्यात आली.
शहरात गुंडप्रवृत्तीच्या १0 ते १५ जणांचा समावेश असलेल्या एका टोळक्याने बुधवारी रात्रीपासून धिंगाणा सुरू केला असून, त्यांनी विश्‍वकर्मा ज्वेलर्स, वैंश पायन ज्वेलर्सच्या काचा फोडल्या. गांधी रोडवर अश्लील शिवीगाळ करीत महा पालिकेच्या इमारतीवर दगडफेक केली. या घटनेला १२ तासांचा कालावधी होत नाही, तोच या टोळक्याने गुरुवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक चौकात धुडगूस घा तला. यामध्ये टोळक्याने एमएच ४0 वाय ५११३ क्रमांकाच्या बुलडाणा-मंगरुळपीर एसटी बस, एमएच ४0 वाय ५६८४ क्रमांकाची यवतमाळ-धुळे, जुने बसस् थानकावरील एमएच २0 डी ९0८0 क्रमांकाच्या बसची तोडफोड केली. या तीनही बसवर दगडफेक केल्यानंतर लोखंडी शस्त्राने हल्ला चढविला. यावेळी बसस् थानकासमोरून गॅस सिलिंडर भरून जात असलेल्या एमएच २८ बी ७७३३ क्रमांकाच्या ट्रकवरही दगडफेक करून काचांची तोडफोड केली. अशोकनगरवरून खडकीकडे जाणार्‍या शहर वाहतूक शाखेच्या बसच्याही काचा फोडल्या. हा हैदोस झाल्यानंतर या टोळक्याने मध्यवर्ती बसस्थानकावरून पळ काढून दुर्गा चौकातील महावितरणची एमएच ३0 पी ९२४१ क्रमांकाच्या जीपचीही तोडफोड केली. तोंडाला कापड बांधून आलेल्या या टोळक्याने शहरात सशस्त्र हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

*गावगुंडांचे राज्य
जिल्हा पोलिस प्रशासनाचे गावगुंडांसह चोरटे, दरोडेखोर व खंडणीबहाद्दरांवर कुठलेही नियंत्रण राहिले नाही. पोलिसांच्या नाकावर टिच्चून खंडणीबहाद्दरांचा हैदोस सुरू आहे. पोलिस यंत्रणा कुचकामी झाल्याने बुधवारी रात्रीपासून गुंड प्रवृत्तीच्या एका टोळक्याने सशस्त्र धिंगाणा घातला आहे. मात्र, पोलिसांना दोन दिवस उलटल्यावरदेखील यामधील एकाचाही सुगावा लागला नाही. यावरून जिल्हा पोलिस प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगल्या गेली असून, गुंडांनी त्यांना खुले आव्हानच दिल्याचे स्पष्ट होत आहे.

*चार संशयित ताब्यात
बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या या हैदोस प्रकरणातील चार संशयित आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. मात्र त्यांच्यावर ११0 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. यामध्ये बाळापूर येथील रहिवासी उमान मोहम्मद अक्रम, शिवणी येथील रहिवासी शेख रहेमान शेख बिस्मिल्ला, शिराज खान महेमूद खान, मो. आरीफ मो. आतीक यांचा समावेश आहे.

Web Title: In the city of Akola, the villagers' havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.