नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आमदार देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:35+5:302021-04-08T04:19:35+5:30
गायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम आगमनानिमित्त आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष अजूनही भरून ...

नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आमदार देशमुख
गायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम आगमनानिमित्त आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष अजूनही भरून निघाला नाही. नागरिकांनी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष पूर्ण करून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविणार, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी सरपंच दीपमाला संजय वानखडे होत्या तर प्रमुख पाहुणे जि. प. सदस्या वर्षा गजानन वझिरे, उपसरपंच पंचफुला विनायक झटाले, सदस्या अरुणा गोरख खेतकर, विद्या ज्ञानेश्वर भिवटे, सत्यभामा हरिभाऊ ढोक, नसिमून बी हबीबखां उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार देशमुख यांचा नारायण मुंडे, श्रीधर भाकरे, प्रकाश रनवरे, हरिभाऊ ढोक, अब्दुल रऊफ, हबीब खान, संजय वानखडे, गोरख खेतकर, ज्ञानेश्वर भिवटे आदींनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन अमेय कुलकर्णी यांनी केले. (वा.प्र.)
फोटा: ८ बाय ६