संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे- पालकमंत्री कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST2021-04-15T04:18:05+5:302021-04-15T04:18:05+5:30

बुधवारी जिल्हाधिकारी दालनात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ...

Citizens should stay at home and cooperate with the administration during the ban on communication - Guardian Minister Kadu | संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे- पालकमंत्री कडू

संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे- पालकमंत्री कडू

बुधवारी जिल्हाधिकारी दालनात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आस्वले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. ऑक्सिजनची कमतरता पडू नये. यासाठी हवेतून ऑक्सिजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच बेडची कमतरता पडणार नाही याकडे सतत लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० खाटांचे आयसीयू युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्यात.

जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. यासाठी गरजूंची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही. यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

फोटो:

Web Title: Citizens should stay at home and cooperate with the administration during the ban on communication - Guardian Minister Kadu